बुधवारी हनुमान जयंती आणि शब्द ए-बारात असून ते साजरी करण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नका. घरात बसूनच दोन्ही कार्यक्रम साजरे करावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावेळी लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी वनस्पतीसाठी पर्वत उचलून आणला होता. आज जनतेला वाचवण्यासाठी हनुमानासारखं पर्वत उचलण्याची गरज नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबून हनुमान जयंती साजरी करा, अशा पद्धतीने अजित पवारांनी आपल्या नेहमचीच्या स्टाईलमध्ये जनतेला आवाहन केले.
जीवरक्षक औषधांवरील बंदी उठविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले...
उद्या असणारी हनुमान जयंती आणि शब्ब-ए-बारातसाठी नागरिकांनी घरा बाहेर पडू नये. पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच बसून करावी, असं आवाहन अजित पवारांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक नागरिकाचे एकमेव कर्तव्य आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण सर्वांनी कोरोनासंसर्गाची ही साखळी तोडली पाहिजे, असे अजित पवारांनी सांगितले.
धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ७ वर; दोन नव्या रुग्णात भर
तसंच, नागरिकांनी घराबाहेर न पडता, कोणत्याही नागरिकांच्या संपर्कात न येता, पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्यक्रम घरातच करावेत, असे अजित पवारांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण जग कोरोनाचा मुकाबला करत आहे. यावेळी आरोग्याचं आणि जागतिक आरोग्य संघटनेचं महत्वं सर्वांच्या लक्षात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताचे मोठे पाऊल, हायड्रोक्सिक्लोरिक्विनवरील निर्यात बंदी हटवली