पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका : उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वारंवार गर्दी करु नका, प्रवास टाळा असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन न करता लोकं घराबाहेर पडत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. 'आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, कृपया घरीच रहा, अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.

एक कोरोनाबाधित रुग्ण कमाल चार जणांपर्यंत संसर्ग पसरवू शकतो, संशोधन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी ट्विट करत पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचे काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, कृपया घरीच रहा, अशी विनंती करतो.', असे त्यांनी सांगितले. तसंच, मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पुण्यातील कंपनीच्या कोविड-१९ चाचणी किटला केंद्रांची मंजुरी

दरम्यान, राज्यात संचारबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार असे सरकारने सांगितले तरी सुद्धा नागरिक भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत. त्यामुळे 'भाजीपाल्यासाठी बाजारात गर्दी करू नका, अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल,' असा इशारा त्यांनी दिला. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १०१ वर पोहचली आहे. तर मंगळवारीन आखणी एका कोरोनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

रजनीकांत यांची चित्रपटसृष्टीतील कामगारांना ५० लाखांची मदत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus deputy chief minister ajit pawar says dont be forced to take even more drastic measures