पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रत्नागिरीतील रुग्णासह राज्यात ४५ जण कोरोनाच्या जाळ्यात

कोरोनाची धास्ती कमी होण्याचे चिन्हे दिसत नाहीत.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचं थैमान थांबण्याच नाव घेताना दिसत नाही. बुधवारी नव्याने समोर आलेल्या चार रुग्णानंतर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४५ वर जाऊन पोहचला आहे. रत्नागिरीतील परदेशातून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यापूर्वी मागील काही तासांत पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली होती. 

५ पेक्षा अधिक लोकांच्या जमावावर बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

मंगळवारी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४१ इतका होता. बुधवारी पुण्यातील आणखी एका रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा रुग्ण आढळला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये जो रुग्ण आढळला आहे तो परदेशातून परतलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील असल्याचे समजते. यासोबतच मुंबई आणि रत्नागिरीतही प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीमध्ये दुबईहून परतलेल्या एकाची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. नव्या चार कोरोनाग्रस्तांमुळे राज्याची चिंता आणखी वाढवणारी अशीच आहे. 

रेल्वे, मेट्रो, बसेसमधील प्रवासी क्षमता कमी करणार: मुख्यमंत्री

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी सरकार आणि  स्थानिक प्रशासनाकडून अनेक कठोर पावले उचलण्यात येत आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या बंदीनंतर राज्यातील विविध भागात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत.  
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
·    पिंपरी चिंचवड – ११
·    पुणे – ८
·    मुंबई – ८
·    नागपूर – ४
·    यवतमाळ –३
·    कल्याण – ३
·    नवी मुंबई – ३
·    रायगड – १
·    ठाणे -१
·    अहमदनगर – १
·    औरंगाबाद – १
·    रत्नागिरी-१
·    एकूण ४५