पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात  कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी राज्य सरकार  प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत. मात्र मुंबईतील सर्वसामान्य नागरिक नियम पायदळी  तुडवताना दिसत आहेत. मुंबईतील अनेक रस्त्यांवर  सकाळपासून वाहतूक कोंडी आहे. वारंवार गर्दी न करण्याचं  आवाहन करुनही पालथ्या घडावर पाणी असं चित्र येथे आहे. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी जनतेला रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असं आवाहन केलं आहे. 

मुंबईत ६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यात २२ फेब्रुवारीला नाइलाजन सरकारानं १४४ कलम लावले आहे, त्यामुळे पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही. 

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर, रविवारी आढळले १५ नवे रुग्ण

मात्र हे कलम लावताना  केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच बाहेर  पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात बेस्ट, लोकल आणि एसटी सेवाही  ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहे. २२ मार्चला संपूर्ण देशभरात जनात कर्फ्यू लागू करण्यात आला. सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता. राज्यात त्याची मर्यादा वाढवून दुसऱ्या दिवशी  पहाटे पाच पर्यंत करण्यात आली होती.

कोरोनाच्या भीतीने शेअर बाजार कोसळला, १५ मिनिटांत ८ लाख कोटी बुडाले

 संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू झाले असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली पहायला मिळत आहे, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी जनतेला पुन्हा एकदा परिस्थितीचं गांभीर्य समजण्याचं आवाहन केलं आहे.