पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! औषध फवारणीसाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनाच मारहाण

जखमी झालेल्या पालिका कर्मचाऱ्यावर उपचार करताना डॉक्टर

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांकडून ठिकठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. अशात अहमदनगर येथे औषध फवारणीसाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

निजामुद्दीनमध्ये जे घडलं ते इथे घडू देऊ नका, शरद पवार यांची विनंती

अहमदनगरच्या एमआयडीसी आणि बोल्हेगावात पालिका कर्मचाऱ्यांकडून जंतूनाशक औषधांच्या फवारणीचे काम सुरु होते. याच दरम्यान औषध फवारणी कुठे करायची यावरुन वाद करत स्थानिकांनी पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली. अहमदनगर महानगर पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांसह पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांनी मारहाण केली. यामध्ये ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. 

शिंकेतून ८ मीटरपर्यंत पसरु शकतो कोरोना विषाणू, संशोधकांचा दावा

जखमी कर्मचाऱ्यांवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही पालिका कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी जीवाची बाजी लावून प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. मात्र नागरिकांकडून प्रशासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांवरच हल्ले होत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

... म्हणून कोरोनाविरोधातील लढाईत पाकिस्तान अपयशी