पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ वर, ४ नवे रुग्ण आढळले

संग्रहित छायाचित्र

राज्यात मंगळवारी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील ३ तर साताऱ्यात १ नवा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्याने शतक पूर्ण केले आहे. या नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ वर गेला आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढत असलेला आकडा पाहता महाराष्ट्रासमोरील चिंतेत भर पडत असल्याचे दिसत आहे. 

राज्यात सोमवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९७ इतकी होती. त्यात मुंबई ३८, पुणे २८, नवी मुंबई ५, सांगली, नागपूर, यवतमाळ, कल्याण प्रत्येकी ४, नगर, ठाणे प्रत्येकी २, पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, सातारा प्रत्येकी १ अशी संख्या होती. त्यात आता पुण्यामध्ये आणखी ३ आणि साताऱ्यात एका रुग्णाची भर पडली. अशा रितीने हा आकडा १०१ असा झाला आहे.

मुंबईकरांनो सावधान, पोलिसांच्या नावे फिरणारा तो मेसेज FAKE

दरम्यान, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लावण्यात आले होते. रविवारी जनता कर्फ्यू यशस्वी केल्यानंतर सोमवारी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने अखेर सरकारने कठोर निर्णय घेतला. राज्यात आता ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. वारंवार विनंती करूनही नागरिक ऐकत नसल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित जोडप्याविषयी अत्यंत दिलासादायक  बातमी समोर आली आहे. या जोडप्याच्या पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, या चाचणीचा पहिला अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. या जोडप्याला १४ दिवस पुण्यातील नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांचा दुसरा अहवाल येण्याची प्रतिक्षा आहे.

कोरोना : शाहीन बागमध्ये पोलिसांची कारवाई, आंदोलकांना हटविले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus affected person increases in maharashtra 3 in pune and 1 found in satara total 101 covid 19 patient