पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर, १६२ रुग्णांना डिस्चार्ज

कोरोना विषाणू

राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

औषध देण्याच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी मानले मोदींचे आभार 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ हजार ९० नमुन्यांपैकी २५ हजार ७५३ जणांचा कोरोना तपासणी अहाल निगेटिव्ह आला आहे. तर ११३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४  जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

कोरोना: आर्थिक अडचणीत करदात्यांना मोठा दिलासा!

दरम्यान, बुधवारी राज्यात ८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या मृतांपैकी ५ जण मुंबईचे तर २ पुण्याचे आणि एक जण कल्याण डोंबीवलीमधील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७२ झाली आहे. निजामुद्दीन येथील  झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

कोविड -१९: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'लर्न फ्रॉम होम'चा उपक्रम