पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

झारखंडमध्ये मतदान

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. 

कोरोनावर खासगी रुग्णालयातही उपचार घेता येतील - आरोग्यमंत्री

मदान यांनी सांगितले की, राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या अशी विनंती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचा १० ऑगस्ट २००५ रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.

कोरोनामुळे मुंबईत एका वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू

राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. मात्र कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक तसेच नाशिक, धुळे, परभणी आणि ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणुक होणार होती ती सुध्दा पुढे ढकलण्यात आली आहे. 

कोरोनाचे साईड इफेक्ट्स, चीनमध्ये घटस्फोटांच्या संख्येत वाढ

दरम्यान, वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्या तसेच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, असे मदान यांनी सांगितले. 

नौदलामध्येही महिलांना कायमस्वरुपी नेमणूक, सुप्रीम कोर्टाचे आदेश