पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे इराणमध्ये ३४ कोल्हापूरकर अडकले, सुप्रिया सुळेंनी केली मदतीची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे

कोरोनामुळे इराणमध्ये अडकून पडलेल्या ३४ कोल्हापूरकरांना मदत करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी  परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडे केली आहे. कोरोनाचा फैलाव इराणमध्ये वाढत चालला आहे. चीननंतर कोरोनाचे सर्वाधिक बळी इराणमध्ये गेले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे इराणमध्ये आठवड्याभरात ६६ रुग्ण दगावले आहेत. 

दिल्लीत दंगलीची अफवा पसरवणाऱ्या २४ जणांना अटक

'कोरोना व्हायरसच्या भीतीने विमान वाहतूक बंद केल्यामुळे कोल्हापूर आणि  परिसरातील ३४ जण इराण येथे अडकले आहेत. त्यामुळे एस जयशंकर यांनी सर्वांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत' अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे. 'यासर्वांचे  पासपोर्ट आणि तपशील यांची माहिती दिली आहे त्यामुळे या सर्वांना मदत करावी' अशी विनंती सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमधून केली आहे. 

'चीन, इराण, सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा'

गेल्याच आठवड्यात जपान आणि चीनमध्ये कोरोनामुळे अडकलेल्या शेकडो भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले होते. कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळलेल्या देशांची संख्या ६० पेक्षा जास्त झाली असून, आतापर्यंत या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या जगभरात ३००० पर्यंत जाऊन पोहोचली आहे. जगभरात सध्या ८८,००० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. जगाच्या नकाशावरील सर्वच खंडामध्ये कोरोनाच्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर चीननंतर इराणमध्ये कोरोनामुळे दहशत माजली आहे. गेल्याच आठवड्यात इराणच्या उपराष्ट्रपतींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

इशांत शर्माची दुखापत द्रविड यांना गोत्यात आणणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Corona Virus Crisis 34 Individuals frm Kolhapur and surrounding stuck in Iran MP supriya sule ask for help