पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उदयनराजेंना आवरा, नाही तर पक्षातून बाहेर पडू, रामराजेंचा इशारा

रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले

खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन उदयनराजे यांनी रामराजे निंबाळकरांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना रामराजे यांनी आता राष्ट्रवादी सोडण्याचा इशारा दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना आवरा, नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, उदयनराजेंवर टीका केल्याने सातारामध्ये संतापलेल्या उदयनराजे समर्थकांनी रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

'जातीऐवजी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्वांनाच आरक्षण मिळावे'

यावेळी खासदार उदयनराजे भोसले, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना रामराजे यांची जीभ घसरली.  

धक्कादायक! महाराष्ट्रातील १५ खासदारांवर गंभीर गुन्हे

दुसरीकडे, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही रामराजे निंबाळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. जलसंपदा मंत्री असताना रामराजे यांना आपल्या हक्काचे पाणी बारामतीला देताना लाज वाटली नाही. आता सरकारने दुष्काळी भागाला पाणी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये तांत्रिक मुद्दे काढत असल्याचा आरोप केला. तसेच छत्रपती घराण्यावर केलेली टीका तुम्हाला शोभते का, असा सवालही केला.