पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भरधाव कंटेनर पोलिसांच्या तंबूत घुसला; दोन ठार, एक जखमी

भरधाव कंटेनर पोलिसांच्या तंबूत घुसला; दोन ठार, एक जखमी

नवरात्र आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणीसाठी उभारलेल्या तंबूत भरधाव कंटनेर घुसल्याने एका पोलिस कर्मचाऱ्यासह होमगार्डचा मृत्यू झाला. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा रस्त्यावरील येडशी उड्डाणपुलाजवळ आज (गुरुवार) पहाटे तीनच्या सुमारास घडला. या अपघातात आणखी एक होमगार्ड गंभीर जखमी झाला आहे. 

करमाळ्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी रद्द, अपक्षाला पाठिंबा

दीपक नाईकवाडी (पोलिस नाईक) आणि संतोष जोशी (होमगार्ड) असे मृतांचे नाव असून वसंत गाडे हे जखमी झाले आहेत. 

नवरात्र आणि विधानसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी येरमाळा रस्त्यावरील येडशी पुलाजवळ एक तात्पुरता चेक नाका उभारला आहे. हा तंबू सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला असून मध्ये बॅरिकेड्स आहेत. पहाटे तीनच्या सुमारास एक भरधाव कंटेनर औरंगाबादहून उस्मानाबादकडे येत होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा कंटेनर बॅरिकेड्स तोडून रस्त्याचा पलीकडे असलेल्या तंबूत घुसला. त्यावेळी तंबूत दीपक नाईकवाडी, संतोष जोशी आणि वसंत गाडे हे होते. 

घरावर संकट आले म्हणून पळायचे नसते: बाळासाहेब थोरात

नाईकवाडी आणि जोशी हे कंटनेरखाली चिरडले गेले. तर गाडे हे जखमी झाले. गाडेंवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्तव्यावर असताना दोन तरुण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Container infiltrated in police tent two dead including police constable and home guard dead on yermala yedshi road