मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत मुंबईच्या बांद्रा येथील त्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे राहत आहेत.
'शासकीय बंगल्यावर तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु आहे', अशी माहिती आयएएस अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली.
पालघर प्रकरण: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून पोलिस महासंचालकांना
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या एका पुरुष हवालदाराचीही कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली आहे, अशीही माहिती याच वृत्तसंस्थेनं यापूर्वी दिली होती. या हवालदारावरही उपचार सुरु आहेत तर त्यांच्यासोबत काम करत असलेल्या इतरांना क्वारंटाइन होण्यास सांगितलं आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार २१८ वर पोहचला आहे. मागील २४ तासांत १९ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असून राज्यातील मृतांचा आकडा हा २५१ इतका झाला आहे.