पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लातूरमध्ये भाजपला धक्का, काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर

लातूरचे नूतन महापौर विक्रम गोजमगुंडे

लातूर महानगरपालिकेत अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत आली आहे. काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव करत महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. उपमहापौरपदी भाजपचे चंद्रकांत बिराजदार निवडून आले. त्यांना काँग्रेसने मदत केली. भाजपमधील संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यातील गटबाजीचा अचूक फायदा काँग्रेसने घेतला.

सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

लातूर महानगरपालिकेत भाजपाने ७० पैकी ३६ जागा जिंकत सत्ता हस्तगत केली होती. भाजपने अडीच वर्षे सत्ताही राखली. मात्र राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाचा थेट परिणाम लातूर महानगरपालिकेवर ही पाहावयास मिळत आहे. ७० पैकी ३६ जागा भाजपाच्या होत्या. यात एका नगरसेवकाचे अकाली निधन झाल्याने संख्याबळ झाले. काँग्रेसचे संख्याबळ हे ३३ एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. हे नगरसेवक नंतर वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. 

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे

या सर्व पार्श्वभूमीवर महापौरपदाची निवडणूक लागली. भाजपतील चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड या दोन नगरसेवकांनी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विक्रांत गोजमगुंडे यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे भाजपातील गटबाजी उघड झाली. उपमहापौरपदासाठी चंद्रकांत बिराजदार यांना काँग्रेसने साथ दिली. भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार शैलेश गोजमगुंडे आणि उपमहापौरपदाचे उमेदवार भाग्यश्री कौलखैरे यांचा पराभव झाला.

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर