पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खातेवाटपावरून काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड, उद्धव ठाकरेंकडे फेरविचाराची मागणी

बाळासाहेब थोरात

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवरून आम्ही नाराज आहोत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला दोन ते तीन महत्त्वाची खाती देण्याचा नक्की विचार करतील, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण नक्की कोणती महत्त्वाची खाती हे उघडपणे सांगण्यास त्यांनी नकार दिला. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी, ३० डिसेंबर रोजी होतो आहे. त्यापूर्वीच आघाडीतील एका पक्षाने थेट नाराजी व्यक्त केल्याने उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते.

टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीचा मृत्यू, मनोरंजन विश्वात हळहळ

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाला ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या ग्रामविकास, सहकार किंवा कृषी यापैकी एक खाते तर गृहनिर्माण आणि उद्योग या खात्यांपैकी एक खाते हवे आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला अधिकची खाती मिळाली तर आनंदच होईल. आमच्याकडे खूप नेते आहेत. त्यामुळेच आम्हाला मंत्रिमंडळातील जास्त खाती हवी आहेत. अर्थात हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी सांगितले.

कारगिल युद्धातील हिरो मिग-२७ आज निवृत्त

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला आधी उपमुख्यमंत्रीपद हवे होते. पण नंतर वाटाघाटीमध्ये काँग्रेसला विधानसभेतील अध्यक्षपद देण्यात आले. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, काँग्रेसने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पण खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ती फेटाळून लावली.