पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन झाले. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. संगमनेर येथील राहत्या घरी सोमवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रवरा नदीतिरावर असलेल्या अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

जैश-ए-मोहम्मदने दिली रेल्वे स्टेशन आणि मंदिर उडवण्याची धमकी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकून संगमनेर मतदार संघाचे आमदार झाले होते. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली.  त्यांनी सहकार, पाटबंधारे, कृषी, नियोजन, अन्न व नागरी पुरवठा, विधी व न्याय, प्रसिध्दी, माहिती, परिवहन यासारख्या खात्यांचा कार्यभार सांभाळला होता. त्यांनी गांधीजींच्या 'चले जाव' या चळवळीत सहभाग घेतला होता. तसंच संगमनेरमध्ये सहकारी साखर कारखाना त्यांनी सुरु केला होता. या कराखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांनी काम केले होते. 

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा: उध्दव ठाकरे

बी. जे. खताळ राजकारणासह सहकार, शेती, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनिय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. खताळ यांच्या 'गुलामगिरी', 'धिंड लोकशाहिची', 'अंतरीचे धावे', 'लष्करी विळख्यातील पाकिस्तान' आणि 'गांधीजी असते तर' या प्रसिध्द पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले. विशेष म्हणजे त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. १०० व्या वर्षी त्यांनी माझे शिक्षक आणि १०१ व्या वर्षी त्यांनी वाळ्याची शाळा हे पुस्तक लिहिले. 

'छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, आदेश द्यायचे असतात'