पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचांदूर नगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता; नगराध्यक्षपदी सविता टेकाम

गडचांदूर नगरपालिका निवडणूक

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वाधिक ९ जागा जिंकून बहुमत मिळवलं आहे. गडचांदूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता टेकाम विजयी झाल्या आहेत. 

सायरस मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगित

१७ जागांसाठी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस ५, राष्ट्रवादी ४, शिवसेना ५, भाजप २ आणि शेतकरी संघटना एका जागेवर विजयी झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी प्रचार करूनही भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. तर शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. 

जेएनयू हिंसाचार: ३ प्राध्यापकांची दिल्ली हायकोर्टात धाव

गडचांदुर नगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले होते तर आज निकाल जाहीर झाला आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता टेकाम विजयी झाल्या आहे. सविता टेकाम यांनी भाजप उमेदवाराचा ११०० मतांनी पराभव केला. निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

Khelo India 2020: सरावा दरम्यान खेळाडूच्या गळ्यात