पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : खड्ड्यांवरून नीतेश राणे आणि कार्यकर्त्यांची अभियंत्यावर चिखलफेक

घटनास्थळी अभियंत्यावर चिखल फेकताना

मुंबई ते गोवा महामार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करणाऱ्या आमदार नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच या रस्त्याचे काम करणाऱ्या अभियंत्यावर गुरुवारी चिखल फेकला. यानंतर संबंधित अभियंत्याला एका पुलाला बांधूनही ठेवण्यात आले. एएनआयने या संदर्भातील व्हिडिओ ट्विट केला आहे.

प्रकाश शेडेकर असे चिखल फेकण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. नीतेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते या भागात महामार्गाची पाहणी करीत होते. त्यावेळी महामार्गावर रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे नीतेश राणे यांची अभियंत्याशी वादावादी झाली. त्यावेळी तिथे असलेल्या काही कार्यकर्त्यांनी बादलीतून आणलेला चिखल प्रकाश शेडेकर यांच्यावर ओतला. यानंतर कार्यकर्त्यांनी ढकलत त्यांना पुलाकडे नेले. तिथे पुन्हा एकदा नीतेश राणे प्रकाश शेडेकर यांना तावातावाने काहीतरी बोलले. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना दोरीच्या साह्याने पुलाला बांधून ठेवले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress MLA Nitesh Rane and his supporters throw mud on engineer Prakash Shedekar Mumbai Goa highway