पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा'

मल्लिकार्जुन खर्गे

संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडावा. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. 

दिल्ली आंदोलन: काही मेट्रो स्टेशन सुरु, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण
 
नागपूर येथे यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी आवाहन केले आहे. या बैठकिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत खर्गे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून सद्य राजकीय परिस्थिती आणि संघटनात्मक कार्याची माहिती घेतली. 

नागरिकत्व कायदाः लखनऊ-अहमदाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

यावेळी खर्गे यांनी सांगितले की, राजकीय पक्ष विचारधारेवर चालतात. पदापेक्षा विचारधारा महत्त्वाची आहे. काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळते त्यामुळे सर्वांनी गट तट विसरून एकत्रितपणे संघटना मजबूत करावी आणि भाजपच्या धर्मांध विचारधारेचा पराभव करावा, असे आवाहन खर्गे यांनी केले आहे. 

CAA: वाहतूक कोंडीत अडकले वैमानिक; इंडिगोच्या १९ विमानांचे उड्डाण रद्द