पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विनाकारण आम्हाला बदनाम करू नका'

संजय निरुपम

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी ज्यांना बहुमत मिळाले आहे. त्या भाजप आणि शिवसेनेची आहे. काँग्रेसची ही नैतिक जबाबदारी नाही, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी एक ट्विट प्रसिद्ध करून राज्यात सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसला कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे. यासाठी आम्हाला बदनाम करू नये, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

राज्यात सत्ता स्थापन करण्याचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप जाहीरपणे पाठिंबा दिलेला नाही. आम्ही दोन्ही पक्ष एकत्रपणे निवडणूक लढलो होतो. त्यामुळे पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही एकत्रितपणेच घेऊ, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दोन दिवसांपासून सांगण्यात येत आहे. राज्यात मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठकही होण्याची शक्यता आहे. 

आमच्यात एकवाक्यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा नाहीः अजित पवार

या सर्व पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी हे ट्विट केले आहे. राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांवरच असेल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय निरुपम यांनी पहिल्यापासून शिवसेनेला पाठिंबा देण्याला विरोध केला आहे. शिवसेनेला पाठिंबा दिल्यास त्याचा काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, असाही धोका संजय निरुपम यांनी आधीच सांगितला आहे.