पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५० नेते भाजपच्या संपर्कातः गिरीश महाजन

गिरीश महाजन

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. पक्षात येण्यासाठी आम्ही कोणाला धमकावण्याचे काहीच कारण नाही, स्वतःचे अपयश लपवण्यासाठीच ते भाजपवर आरोप करत आहेत, असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५० नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

पवारसाहेबांनी आत्मचिंतन करण्याची गरज, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

चित्रा वाघ यांच्या पतीवरील एसीबीच्या कारवाईची धमकी देत पक्षात प्रवेश दिल्याच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, चित्रा वाघ या दीड महिन्यापूर्वीच मला भेटल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत आपले मन लागत नसल्याचे म्हटले होते. 'एबीपी माझा'शी ते बोलत होते.

चौकशीची भीती दाखवून नेत्यांना धमकावलं जातंय, शरद पवारांचा सरकारवर आरोप

पुढे ते म्हणाले की, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई ही कायद्यानुसार सुरु आहे. सुडबुद्धीने कारवाई करायची असती तर सुनील तटकरे, अजित पवारांवरही कारवाई केली असती. पण आम्ही नियमानुसार कारवाई केली. ईडी सीबाआय चौकशीमध्ये मुख्यमंत्री कुठलाही हस्तक्षेप करत नाही. पवारांनी नावे घेतलेले सर्व नेते आम्हाला भेटून गेले आहेत. त्यांनी आम्हाला पक्षात घ्या अशी विनंती केली आहे, असा दावा महाजन यांनी केला.

मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही: शरद पवार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress and ncps 50 leaders in touch with bjp for enter into party says minister girish mahajan