पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपल्याच आमदारांबद्दल शंका घेणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी - मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

आपल्याच पक्षाच्या आमदारांबद्दल शंका घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे. भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. आमचा पक्ष कोणत्याही आमदाराच्या संपर्कात नाही, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सांगितले.

आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही: विजय वडेट्टीवार

कालपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजपकडून आमदारांच्या खरेदीसाठी दबाव टाकला जातो आहे. काही आमदारांना पैशांचे आमिष दाखवले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना भाजपवरील सर्व आरोप साफ शब्दांत फेटाळले. राज्यातील जनतेचा महाजनादेश महायुतीच्या बाजूने आहे. महायुतीचेच सरकार यावे, यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.

आम्ही कोणत्याही आमदाराला फोन केल्याचे पुराव्यानिशी दाखवून द्या. फोन रेकॉर्ड करा, असेही आव्हान यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.  

नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...

शिवसेनेचाही कोणताही आमदार फुटणार नाही. १५ वर्षे सत्तेत नसतानाही शिवसेनेचे आमदार कधी फुटले नाहीत. हे सर्व आमदार दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आहेत. त्यामुळे ते कधीच पक्ष सोडणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.