पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हॉटस्पॉट नसलेल्या भागांना २० एप्रिलपासून हा दिलासा

दिल्ली अन्नवाटप

राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरतं राहण्याच्या दृष्टीने हे सुधारित मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या महिन्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे, या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत, मात्र २० एप्रिलनंतर हॉटस्पॉट वगळता ज्या भागात कोरोनाचा फैलाव नाही  अशा भागात सूट देण्यात येणार आहेत.

नौदलातील किमान २० जणांना कोरोनाची लागण

 कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित राहून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळण्यासह नियमित मास्क घालणे आणि इतर कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. या भागातील शिकवण्या  आणि प्रशिक्षण संस्था या बंदच राहतील, मात्र शिक्षक ऑनलाइन कोचिंग क्लासद्वारे  विद्यार्थ्यांना शिकवू शकतात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

घरभाडे वसुली ३ महिने पुढे ढकला, सरकारचे मालकांना निर्देश

२० एप्रिल पासून या सेवांना लॉकडाऊनमधून सूट दिली आहे
- रुग्णालये, संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा, औषध दुकाने व वैद्यकीय साहित्य उत्पादन व विक्री केंद्रे सुरू राहतील.
-  कृषी विषयक कामे तसेच कृषी व बागायती कामांसाठी लागणारी साहित्य विक्री व उत्पादन करणारे याना सूट दिली आहे.कृषी माल खरेदी केंद्रे, कृषी माल खरेदी विक्री केंद्रे, मार्केट यार्ड, मासेमारी क्षेत्राला यामधून सूट दिली आहे. 
- सागरी व स्थानिक मासेमारी, मत्स्य उत्पादनाशी संबंधित व्यवसाय यांना सूट दिली आहे.
- चहा, कॉफी, रबर, बांबू, नारळ, सुपारी, कोकाआ, काजू आणि मसाले यांच्या वृक्षारोपणाची कामे. तसेच यांच्यावरील प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि मार्केटिंगची कामे जास्तीत जास्त ५० टक्के मजुरांसह करता येतील.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसंदर्भात आयसीसीकडून स्पष्टीकरण

- दूध प्रक्रिया केंद्रांकडून केले जाणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री आणि त्यांची वाहतूक सुरु राहील.
- पोल्ट्री फार्म, हॅचरीज चालवता येतील
- पशुखाद्य निर्मिती प्रकल्प सुरु राहतील. तसेच मका, सोया यासारख्या कच्च्या मालाचा पुरवठा  सुरु राहील.
- गोशाळा, प्राण्यांचे शेल्टर होम यांचे कार्यान्वयन सुरु राहील.
- वने आणि वनेतर क्षेत्रातील तेंदुपत्ता संकलन, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री
- भारतीय रिझर्व्ह बँक आणि त्यांच्यामार्फत नियंत्रीत केले जाणारे एनपीसीआय, सीसीआयएल सारख्या वित्तीय संस्था, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, एनबीएफसी, एचएफसी या कमीतकमी कर्मचाऱ्यांसह सुरु राहतील.
- बँक शाखा आणि एटीएम, बँक व्यवहारासाठी आवश्यक असलेले आयटी पुरवठादार, बँकिंग करस्पॉडंटस्, एटीएम ऑपरेशन आणि कॅश मॅनेजमेंट एजन्सिज सुरु राहतील. सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक.

'लॉकडाउनमध्ये फी मागितली तर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवा

- सेबी, आयआरडीएआय आणि इन्शुरन्स कंपनीज सुरु राहतील
- सहकारी पतसंस्था सुरु राहतील
- बालके, दिव्यांग, गतिमंद, ज्येष्ठ नागरीक, निराधार, महिला, विधवा यांची निवासीगृहे सुरु राहतील.
- अल्पवयीन मुलांची निरीक्षण गृहे, संरक्षण गृहे
- ज्येष्ठ नागरिक, विधवा, स्वातंत्र्य सैनिक यांच्या निवृत्त योजनांमधील निधीचे वाटप, तसेच निवृत्तीवेतन आणि प्रॉव्हिडंट विषयक सेवा सुरु राहतील.
-  बालके, स्तनदा माता यांना पोषण आहाराचा घरपोच पुरवठा केला जाईल.  लाभार्थी अंगणवाडीत येणार नाहीत.
-  सोशल डिस्टंसिंग (सामाजिक अंतरा)च्या नियमांचे पालन करुन तसेच मजुरांनी चेहऱ्यावर मास्कचा वापर करुन मनरेगाची कामे करता येतील.
-  सिंचन आणि जलसंधारणाच्या कामांना मनरेगामधून प्राधान्य देण्यात येईल.
-   पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन आणि गॅस क्षेत्रातील कामे जसे की, रिफायनिंग, वाहतूक, वितरण, साठवणूक आणि  विक्री सुरु राहील.

- वीजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण सुरु राहील.
- पोस्टल सेवा सुरु राहील.
- महापालिकांसह विविध  स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे कामकाज सुरु राहील
- दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवठ्याचे कामकाज सुरु राहील
- दुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे सुरु राहतील. टँकरने पाणीपुरवठा, वाहनांमधून शुखाद्य पुरवठा सुरु राहील