पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात लवकरच ७ ते ८ हजार पदांची मेगा पोलिस भरती

महाराष्ट्र पोलिस (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील ठाकरे सरकार लवकरच बेरोजगारांना दिलासा देणार आहे. गृह विभागातील रिक्त जागांसाठी मोठ्याप्रमाणात भरती केली जाणार आहे. गृह खात्यातील रिक्त ७ ते ८ हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. 

मोदी सरकारपुढे आता महागाईचे संकट, काँग्रेसची जोरदार टीका

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले की, अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहे. पोलिस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. 

'अरे! ये गँग तो बनने से पहले ही टुकडे टुकडे हो गया...'

गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहन त्यांनी केले.

कुटुंब सोडून पळालेल्या पतीला पत्नीकडून कोर्टातच चोप

दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांनी अमरावतीमधील वज्जर येथील एका अनाथाश्रमाचा पाहणी केली. यावेळी देशमुख यांनी स्वतःच्या हाताने चुलीवर चहा करुन तो मुलांना दिला. यावेळी त्यांनी मुलांबरोबर गप्पाही मारल्या.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coming days maharashtra government fulfill 7 to 8 thousand jobs in home minister department