पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालयः उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्या विविध कामांसाठी नागरिकांना सातत्याने मुंबईत मंत्रालयात यावे लागते. मंत्रालयात ग्रामीण भागातील लोकं मोठ्या संख्येने येतात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना भेटायचे कसे हा प्रश्न असतो. या लोकांना मुंबईत मंत्रालयात हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात केली. 

शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

नागरिकांनी त्यांच्या अडीअडचणी, समस्या आपल्या विभागातील कार्यालयात सांगाव्यात. हे विभागीय मुख्यमंत्री कार्यालय हे मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाशी संलग्नित असेल. तेथून थेट लोकांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. हजारो नागरिक आपल्या प्रश्नांसाठी दररोज मंत्रालयात येतात. त्यांना विभागीय स्तरावर प्रश्न मांडता येतील.

खूशखबरः पूर्व विदर्भात स्टिल प्रकल्प, कुपोषण निवारण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह

तत्पूर्वी, मी विदर्भाचा नातू असल्याचा मला अभिमान आहे. माझी आजी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील होती, असे त्यांनी सांगितले. तसेच विदर्भाच्या विकासात कुठेही कुचराई करणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला. 

'घोटाळा नाहीच,कॅगच्या अहवालाचा चुकीचा अर्थ काढला'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cmo office will be set up in every region of the state says cm uddhav thackeray assembly winter session nagpur