पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्य सरकार माहितीपटातून कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावणार

शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकाची मोठी घोषणा

नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्याला कोणताही ऑफलाइन किंवा ऑनलाइन  फॉर्म  भरण्याची गरज भासणार नाही. अगदी सुलभपद्धतीने कर्जमाफी देण्याचा विचार ठाकरे सरकारने घेतलाय. माहितीपटाच्या माध्यमातून कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावून सांगितली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.    

राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालयः उद्धव ठाकरे 

नागपूर अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, आमदार, खासदार आणि सरकारी कर्मचारी वगळता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. कर्जमाफीचा पैसा बँकांमध्ये जमा न होता थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मार्चपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होईल. या प्रक्रियेबद्दल चित्रफितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावागावात जाऊन माहिती दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय बळीराजा जलसंजीवनी योजनेतील रखडले ५२ प्रकल्प  जून २०१२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. 

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, फडणवीसांचा आरोप

नागपूरमधील अधिवेशनानंतर ठाकरे सरकारने केलेल्या घोषणा पुढील प्रमाणे 

#शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९'  या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपये कर्जमाफी 

#शेतकऱ्यांनी मार्च २०१५ नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी भरुन सरकार त्यांना कर्जमुक्त करणार तसेच उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकीची रक्कम सुध्दा या योजनेसाठी पात्र

#पुढच्या दोन महिन्यात सर्व बँका, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पाडले जाईल. तसेच, योजनेच्या ठळक वैशिष्ट्यांची गाव पातळीवर प्रसिद्धी करून कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात येईल.

#योजनेच्या अंमलबजावणीमुळे सर्व लाभार्थी शेतकरी सन २०२०-२१ पीक हंगामासाठी नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरतील

#ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना सुध्दा प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत योजना लवकर जाहीर करण्यात येणाप 

#पुढील महिन्यापासून दहा रुपयांत भोजन देणारी 'शिव भोजन योजना' राज्यात सुरू करण्यात येणार

#सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार, पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी सेवा पुरवली जाणार 

#गोंदिया येथे प्रलंबित असणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येईल व आवश्यक वैद्यकीय कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल

#विदर्भातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न. लोणार सरोवराच्या संवर्धन आणि परिसरातील पर्यटन ठिकाणांच्या विकासावर भर. 

#अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी नवे स्त्रोत निर्माण करण्यास भर देणार 

#राज्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरण व सुधारणांसाठी चालू असलेल्या HAM योजनेत बँकांकडून उपयुक्त प्रतिसाद मिळत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधीचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा सरकार प्रयत्नशील