पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गर्दी करु नका नाहीतर कठोर पावलं उचलावी लागतील, ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरे (PC Mohd Zakir)

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु, नागरिक गर्दी करत असतील तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

दुकाने २४ तास सुरु राहतील. तुम्ही घराबाहेर पडू नका. आवश्यक असेल तरच बाहेर पडा. गुणाकाराचा हाच काळ आहे. या काळामध्येच आपल्याला त्याची वजाबाकी करायची आहे. या युद्धात आपण नक्की जिंकू. 

'जीवावर उदार होत मेहनत घेणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा अभिमान'

या काळात गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांनी राज्यातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. जीवावर उदार होत अनेक मंडळी २४ तास काम करत आहेत. या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा मला अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी त्यानी साखर कारखान्यांना विनंती करत त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याच्या सूचना केली. कामगारांची वाहतूक करु नका असे सांगत ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची परिस्थिती वाईट झाल्याचे त्यांनी म्हटले.

कामगारांनी स्थलांतर थांबवावं, राज्य सरकार त्यांची सोय करेलः सीएम