पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर विद्यापीठ नामविस्ताराबाबत CM ठाकरेंची राज्यपालांकडे विनंती

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठचा 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा नामविस्तार व्हावा अशी मागणी

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करावा, अशी विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे. 

केवळ कोल्हापूरमधील विद्यापीठ नव्हे तर राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष व दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम व ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याच्या दृष्टीने बदल करण्याचा मानस यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

आठवलेंनी या घोषनेबद्दल CM उद्धव ठाकरेंचे मानले आभार

काही दिवसांपूर्वीच राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही शिवाजी महाराजांच्या एकेरी नावाचा उल्लेख टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या नावाचाही विस्तार करण्याची मागणी जोर धरत होती. या मागणीसंदर्भात अनेक संमिश्र प्रतिक्रिया ही उमटल्याचे पाहायला मिळाले होते. 

..तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज खडसेंचा पक्षश्रेष्ठींना इशारा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cm uddhav thackeray urge to rename kolhapur university as chhatrapati shivaji maharaj university