महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झालेल्या सरकारची उद्यापासून खऱ्या अर्थाने कसोटी सुरु होणार आहे. नागपूरमध्ये सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जे स्वत:ला राज्यकर्त्ये समजत होते त्यांचा डाव फसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
स्थगिती सरकारमुळे महाराष्ट्र ठप्प, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
राज्यात अनेक समस्या आहेत. चिंताग्रस्त शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. नव्याने स्थापन झालेले सरकार हे जनतेचे सरकार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे जनतेचे सेवेसाठी आहेत. मला प्रशासनाचा अनुभव नाही हे मला मान्य आहे. पण आत्मविश्वासाच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादाने पुढील पाच वर्षेच नव्हे तर पिढ्यानं पिढ्या चांगले सरकार देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
अभी इश्क के इम्तिहाँ और भी है..नवाब मलिक यांचे सूचक टि्वट
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी महाआघाडी सरकारवर निशाणा साधला होता. सरकार स्थापन होऊन ३ आठवडे होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. खातेवाटपही तात्पुरते करण्यात आल्याचे फडणवीसांनी म्हटले होते.