पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी सांगितली कोरोनाची पॉझिटिव्ह बाजू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'कोरोनाच्या संकटाकडे सकारात्मकतेने पहा. आज आपल्याला गुढीपाडवा जल्लोषात साजरा करता आला नाही. हरकत नाही. पण आपण गुढीपाडवा जरूर साजरा करू. बऱ्याच वर्षांनी लोकं घरात एकत्र आले आहे. जे गमावल होतं ते या निमित्ताने पुन्हा मिळालं आहे. कोरोनाच्या संकटावर मात करून आपण विजयाची गुढी नक्कीच उभारू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोरोनाशी लढा : विनाकारण मलेरियारोधक औषध घेऊ नका, केंद्र सरकार

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत त्यांचे आयुष्य सुखाचे, समृध्दीचे, आनंदाचे आणि निरोगी जावो अशा देखील शुभेच्छा  दिल्या. सर्वांनी आपल्या आई-वडिलांची, लहान मुलांची काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. वर्तमान काळावर भविष्यकाळ आणि भूतकाळाची जबाबदारी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रोजंदारीवर पोट असलेल्यांना मदतीचा हात द्या!-सानिया

त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'मला अनेकांनी विचारले तुम्ही घरी बसून काय करता. तर मी सांगतो. मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो. तुम्ही सुद्धा तुमच्या गृहमंत्र्यांचे ऐका, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसंच, कोरोनाविरोधातील लढाईमध्ये मदतीसाठी अनेक कंपन्या, कंपन्यांचे मालक आणि उद्योजक पुढे आले आहेत. कोणी हॉस्पिटल्स उपलब्ध करून देत आहेत तर कोणी व्हेंटिलेटर्स, मास्क देत आहेत. या लढाईमध्ये सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे देखील त्यांनी सांगितले.