पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, CM ठाकरेंची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संकटाच्या काळातही काहीजण राजकारण करत आहेत. घाणेरडं राजकारण सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचे नाव न घेता केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. गडकरी यांनी राजकारण बाजूला ठेऊन मदत केली, असे ते म्हणाले. 

देशात कोरोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व जनता करतेय: मोदी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्वच दिनदर्शिक 'दीन' झाल्या आहेत. सर्वच दिवस सारखे झाले आहेत. रात्री झोपताना प्रत्येकजण आज काय झाले असे विचारतो. सकाळी आज काय होणार, असा प्रश्न करतो. सर्वजण सण-उत्सव बाजूला ठेवत कोरोनाशी युद्ध करत आहेत. देव मंदिरात नाही, देव आपल्यात आहे. लोकांनी जो संयम पाळला त्यामध्ये देव आहे. आरोग्य दूत, सफाई कामगार यांच्यात देव आहे. माणसा-माणसांत आदर करणे गरजेचे आहे, असे म्हणत त्यांनी सर्वांना बसवेश्वर जयंती, रमजान आणि अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर किंवा मशिदीत जाऊन नमाज अदा करण्याची ही वेळ नसल्याचे लक्षात आणून दिले. 

ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले? आता नियमित पत्रकार परिषद बंद

कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढताना मुंबई पोलिस दलाचे दोन कॉन्स्टेबल शहीद झाले. या दोघांना मी अभिवादन करतो. माणूस तर गेला आहे. पण त्यांच्यासाठी जे काही करायचे आहे ते सरकार करेल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. सगळेचजण तणावात आहेत. डॉक्टरही तणावात जबाबदारीने काम करत असल्याचे त्यांनी म्हटले.

ट्रक डायव्हर मित्रांकडे पत्ते खेळायला गेला, २४ जणांना कोरोनाची लागण

३ मे नंतर काय..

उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या ३ तारखेला लॉकडाऊन संपतोय ३ मे नंतर किती मुभा द्यायची याचा विचार करु. मुंबईत थोडी मुभा दिल्यानंतर मोठी गर्दी झाली. सध्या असे करणे योग्य ठरणार नाही. हळूहळू आपले आयुष्य पूर्वपदावर कसे आणायचे यासाठी आपण पावले टाकत आहोत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा होणार आहे. त्यांना मी दोन-तीन मुद्दे सांगणार आहे. त्यांचेही सहकार्य मिळत आहे. 

सध्या जे रुग्ण सापडत आहेत. त्यातील ८० टक्के जणांना याची कोणतीच लक्षणे आढळून आलेली नाहीत. तसे म्हटले तर ही चांगली गोष्ट आहे. पण २० टक्के हायरिस्क गटात आहेत. यामध्ये व्याधी असलेल्यांना जपावे लागणार आहे. हार्ड इम्युनिटी अद्या सिद्ध झालेली नाही

सध्या कोरोना नसलेल्या रुग्णांना त्रास सोसावा लागत आहे. इतर रुग्णांच्या उपचारासाठी ड़ॉक्टरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या धान्य वाटपावर भाष्य केले. केंद्र सरकारने फक्त तांदूळ दिले आहेत. त्यांनी गहू आणि डाळ देण्याची गरज आहे. मी वारंवार याबाबत केंद्र सरकारला सांगितले असल्याचे ते म्हणाले. 

परप्रांतिय कामगारांविषयी ठाकरे म्हणाले...

सध्या रेल्वे सुरु होण्याची शक्यता नाही. कारण त्यामुळे पुन्हा गर्दी वाढेल. या कामगारांना नंतर घरी जाण्याची सोय केली जाईल. आम्ही केंद्र सरकारशी त्याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे गर्दी करु नका, रेल्वे सुरु होणार नाही, असे ते म्हणाले. त्याचबरोबर राज्यातील कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.