पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात NRC लागू होऊन देणार नाही: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'नागरिकत्व सुधारणा कायद्याची कोणालाही भीती बाळगण्याची गरज नाही. तसंच राज्यात एनआरसी लागू होऊन देणार नाही.', असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'एनपीआरला लागू करण्यापूर्वी मी स्वत: त्या अर्जाची तपासणी करेन.' सिंधुदुर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

शीना बोरा प्रकरणात देवेन भारतींनी महत्त्वाची माहिती लपवली:राकेश मारिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी असे सांगितले की, 'सीएए आणि एनआरसी दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. तर एनपीआर हा तिसरा मुद्दा आहे. कोणाला सुद्धा सीएएची भिती बाळगण्याची गरज नाही. एनआरसी आला नाही आणि येणार सुद्धा नाही. एनआरसीची अंमलबजावणी केल्यास ती केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर हिंदू, दलित, आदिवासी आणि इतरांसाठी समस्या निर्माण करेल.' असे त्यांनी सांगितले. 

'पुरोगामी, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्राचा डाव'

तसंच, 'एनआरसीसंदर्भात केंद्र सरकारने कोणतेही विधान केलेले नाही. एनपीआर ही एक जनगणना आहे आणि मी स्वत: एनपीआरच्या अर्जाची तपासणी करणार आहे. मला नाही वाटत की यामुळे कोणाला काही त्रास होईल. जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते.', असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

Video : मास्टर ब्लास्टर सचिन ठरला लॉरियस पुरस्काराचा मानकरी

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सीएए आणि एनआरसीला विरोध केला आहे. मात्र, शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा दिला आणि राज्यसभेमध्ये मतदानवेळी वॉक आऊट केला होता. 

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग