'आपले सरकार महाराष्ट्राच्या विकासाला कटिबध्द आहे. राज्यातील विकासकामे थांबणार नाही. तसंच राज्याची गती सुद्धा मागे पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नागपूर-हिंगणा मेट्रोच्या उद्घाटना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नितीन राऊत आणि एकनाथ शिंदे यांनी नागपूर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने नागपूर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला.
CAA नुसार नागरिकत्व मागणाऱ्यांना धर्माचा पुरावा द्यावा लागणार
'नागपूरकरांच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांची खूप गरज आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीतही विकासाची मेट्रो सुरु करु. दोन्ही राज्यांचा विकाल होईल. तसंच, केंद्र सरकारने लवकर परवानग्या दिल्या तर महाराष्ट्राचा विकास होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नितीन गडकरी यांनी वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो. श्रेय नाही तर जनेतेचे आशिर्वाद असणे महत्वाचे असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
पूजा भट म्हणते, ...म्हणून मी कधीच CAA-NRCला पाठिंबा देणार
विकास साधायचा असेल तर मुंबई, नागपूर बरोबर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा विकास साधला पाहिजे. नागपूरच्या विकासाचा वेग मागे पडणार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी मला नागपूर मेट्रोतून प्रवास करायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारने हातात हात घालून एकत्र काम केले तर दोन्ही राज्यांचा चांगला विकास होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
खलिस्तान लिबरेशन फोर्सचा म्होरक्या 'हॅपी पीएचडी'ची लाहोरमध्ये