पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरच्या महापौरांवरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे: मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे (Photo by Satish Bate)

नागपूरच्या महापौरांवर झालेल्या गोळीबाराची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला असल्याची माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधानपरिषदेत नियम २८९ अन्वये विचारलेल्या प्रश्नाववर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. नागपूरच्या महापौरांवरील गोळीबारावरुन विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहामध्ये विरोधक आक्रमक झाले होते. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. 

 

प्रियांका गांधी म्हणाल्या, BJP प्रचार करण्यात सुपर हिरो पण,...

दरम्यान, महापौरांवरील गोळीबाराबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती कळताच पोलिस आयुक्तांना बोलावून माहिती घेण्यात आली. तसंच त्यांना तातडीने सक्त कारवाई करण्यात यावी अशी सूचना देण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  तसंच, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे, असल्याचे त्यांनी सांगितले. 

निर्भया प्रकरण: ७ जानेवारीला दोषींच्या डेथ वॉरंटवर होणार सुनावणी

दरम्यान, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी मध्यरात्री गोळीबार केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. ही घटना अमरावती आउटर रिंग रोडवर घडली आहे. संदीप जोशी कारमधून प्रवास करत असताना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांच्या कारवर गोळीबार गेला. त्यांच्या कारवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात ते सुदैवाने वाचले. संदीप जोशी यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

जयपूरमधील ९ बॉम्बस्फोटांप्रकरणी चौघे दोषी, एकाची सुटका