पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये', असे आवाहन मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 'खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात', त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाने सुरु ठेवावे असं ते म्हणाले.

कोविड-१९ : गडकरी-जावडेकरांकडे राज्याची जबाबदारी

लवकरच अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देण्यात येईल त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी सर्वांचा समावेश असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गुरुवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षा येथून व्हिडीओ  कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते, यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. 

कोरोनाशी लढा : राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन देणार

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावी यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

विठूरायाच्या चंदन उटी पूजेला प्रारंभ