पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीवावर उदार होत मेहनत घेणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा अभिमानः सीएम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या संकटाशी लढणाऱ्या डॉक्टरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मानाचा मुजरा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी राज्यातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. जीवावर उदार होत अनेक मंडळी २४ तास काम करत आहेत. या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा मला अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. 

राज्यातील जनतेशी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जेव्हा मी डॉक्टरांशी बोलतो. त्यावेळी माझे मनोधैर्य़ वाढते, असेही ते यावेळी म्हणाले. 

कामगारांनी स्थलांतर थांबवावं, राज्य सरकार त्यांची सोय करेलः सीएम

राज्यात चाचणी केंद्रे वाढवले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे आता काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. न्यूमोनिया रुग्णांची संख्या वाढणार आहे. खासगी डॉक्टरांनी डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे.  यावेळी खासगी डॉक्टरांनीही अशा रुग्णांचे एक्सरे आणि हिमोग्राम काढून घ्यावे. हा गुणाकाराचा काळ आहे. पण आपल्याला वजाबाकी करायची आहे. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील आधीचे कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. या युद्धात आपण नक्की जिंकू. हेही दिवस निघून जातील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत मिळणार शिवभोजन थाळी

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कामगारांनी आपले स्थलांतर सुरु केले आहे. प्रत्येकाला आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. कृपा करुन गोंधळून जाऊन मोठी चूक करु नका. जिथे आहात तिथेच थांबा. महाराष्ट्र सरकार तुमच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करेल, असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे. गर्दी करुन नवीन संकट निर्माण करु नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cm uddhav thackeray praises doctors and state employee who fight against coronavirus covid 19