शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी सांगली बंदचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धवजींनी राऊत यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली आहे.
यापुढे असे विधान खपवून घेणार नाही; बाळासाहेब थोरातांचा इशारा
संजय राऊतांनी उदयनराजेंबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला आहे. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असं आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून शुक्रवारी १७ जानेवारीला सांगली बंद राहील, असं संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांना पदावरुन हटवावे अन्यथा बंद यापुढेही कायम ठेऊ असा इशाराही संभाजी भिडे यांनी दिला आहे.
संजय राऊतांकडून इंदिरा गांधी-करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे
संभाजी भिडे यांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्यात आली तेव्हा बंदची हाक का दिली नाही, असा सवाल त्यांनी संभाजी भिडे यांना विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या मुद्यावरुन संजय राऊत आणि उदयनराजे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर भूमिका मांडताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती.
निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायचे का?: फडणवीस
शिवसेनेने 'शिवसेना' हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला होता. तसेच शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करा असा खोचक टोलाही लगावला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वांचा अधिकार आहे. कुणा एकाची ती मक्तेदारी नाही असं म्हणत उदयनराजेंना वंशज असल्याचे पुरावे दाखवा, असे म्हटले होते.