पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढण्यासाठी 'फिव्हर क्लिनिक्स', ४ टप्प्यात रुग्णालयाची विभागणी

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात फिव्हर क्लिनिक्स सुरु करण्यात येणार आहे. सर्दी, खोकला ताप अशी लक्षणं असलेल्या व्यक्तींनी तिथेच जावे. त्याठिकाणी त्यांची तपासणी केली जाईल आणि मार्गदर्शन केले जाईल. कोरोनासाठी ४ टप्प्यात रुग्णालयात विभागणी करुन आपण आरोग्य सेवा देणार असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जनतेशी संवाद साधला.

कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा शून्यावर आणायचाय : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा विविध स्वरूपाच्या रुग्णांसाठी ४ टप्प्यात रुग्णालयात विभागणी करण्यात येणार आहे. सौम्य लक्षणं दिसणाऱ्यांसाठी एक रुग्णालय असेल, सौम्यपेक्षा जास्त लक्षणं असतील तर दुसऱ्या रुग्णालयात जावे, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी तिसऱ्या रुग्णालयात जावे, अशी विभागणी करण्यात येणार आहे. एकमेकांना लागण होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

... आता सोनिया गांधींकडे ती सूचना मागे घेण्याची मागणी

एन-९५ मार्क आणि पीपीई कीटचा जगभरात तुटवडा आहे. पीपीई किट नाहीत अशा तक्रारी केल्या जात आहेत. पण सरकारने हॅन्ड सॅनिटायझर, मास्क तयार करण्यास परवानगी दिली आहे. तसंच सोयी सुविधा आपण वाढवत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा.  मास्क धुवून परत वापरु शकता. स्वत:चे मास्क स्वत: वापरा दुसऱ्याला देऊ नका. वापरलेला मास्क रस्त्यावर टाकू नका, कोरोनाबाधित रुग्णाचा मास्क असेल तर त्यातून देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे तो सुरक्षित ठिकाणी जाळून टाका, असे त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या परिस्थितीबद्दल पंतप्रधानांनी साधला प्रमुख गटनेत्यांशी संवाद