पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अधिकाऱ्यांसाठी 'तान्हाजी'चा खास शो! अजयसह CM ठाकरेही उपस्थित राहणार

महानगर पालिका अधिकारी अन् मुख्यमंत्र्यांसाठी खास शोचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूर सरदार तानाजी मालुसरे यांच्या शार्याची गाथा सांगणारा 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपट सध्याच्या घडीला चित्रपट बारीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगण याच्यासोबत 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा चित्रपट पाहणार असल्याचे वृत्त आहे. 

दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'चा बोलबाला

महानगर पालिकेतील अधिकारी तसेच नगरसेवकांना मुंबईतील दादर येथील प्लाझा सिनेमा या चित्रपटगृहात तानाजी मालुसरे यांच्या शौर्य गाथेचा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यावेळी अभिनेता अजय देवगण याच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित झाला होता. अजय व्यतिरिक्त काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटासोबत अनेक तगडे चित्रपटही प्रदर्शित झाले. मात्र या चित्रपटाला इतर चित्रपटांच्या तुलनेत मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'चे वर्चस्व दिसून आले. महाराष्ट्रासह अनेक राज्यात या करमुक्त शो सुरु आहेत. 

'तान्हाजी'त दाखवलेला इतिहास नाही म्हणणारा सैफ वादात

मंगळवारी ६ वाजता दादर येथे बृहन्मुंबई महानगरपालिका निर्मित 'वाईल्ड मुंबई' या मुंबई शहरातील नैसर्गिक वारसा दर्शवणाऱ्या चित्रफीतीचा 'मुहुर्त शुभारंभ' होणार आहे. याप्रसंगी वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, भायखळा, मुंबई येथे मुंबईच्यी जैविक विविधता दर्शविणाऱ्या प्रायोजित निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर  कमीतकमी मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचा कल्पकतेनं वापर करुन कांढाणा किल्ला जिंकणाऱ्या कामगिरीची प्रेरणादायी कथा असलेला 'तान्हाजी' हा चित्रपट महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह नगरसेवकांना दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अभिनेता अजय देवगण याची उपस्थितीत राहणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.  


 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CM Uddhav thackeray May be wach Tanhaji The Unsung Warrior Movie Specieal Show With ajay devgan