पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचा केंद्रानं विचार करावा- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

परराज्यातील अडकलेल्या कामगार व मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का याचा केंद्राने विचार करावा आणि एप्रिल अखेरपर्यंत याबाबत गाईडलाईन निर्गमित करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावरील महिला पोलिस कॉन्स्टेबलला कोरोना

परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: ६ लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे, त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे तरीही ते आपल्या मुळगावी परतू इच्छित आहेत, काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात जर ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन यासंदर्भात विचार करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. 

CM ठाकरेंनी पुणे-मुंबईमधील लॉकडाऊनची शिथिलता केली रद्द

मंगळवारी रात्री ट्विट करुन मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CM Uddhav Thackeray has reiterated his demand for special trains to ensure that migrant labour from other States can return home