पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील त्रुटी दूर केल्या जातील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईन घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी दिले.

अजित पवारांनीच सरकार स्थापण्यासाठी संपर्क केला, फडणवीसांचा गौप्यस्फोट

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शासकीय नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले 'महापोर्टल' बंद करण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवदेनही दिले होते. मागील महायुती सरकारने महापोर्टल सेवा सुरू केली होती. त्याविरोधात अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती.

आठवलेंनी या घोषणेबद्दल CM उद्धव ठाकरेंचे मानले आभार