पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चहापानाच्या बहिष्कारावर CM ठाकरेंनी विरोधकांना दिला PM मोदींचा दाखला

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे

जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा होत असताना विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर खोचक टीका केली. एक चहावाला देशाचे नेतृत्व करु शकतो हे आपल्या पंतप्रधानांननी आपल्याला दाखवून दिले.  ही आपल्या देशाची अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच भान ठेवून तरी विरोधकांनी चहापानासाठी यायला हवे होते, असे भाष्य करत उद्धव ठाकरेंनी राज्यातील भाजपवर निशाणा साधला. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडी सरकारने चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले.  

सावरकरांच्या 'त्या' विचाराशी BJP द्रोह करत आहे का? CM ठाकरेंचा सवाल

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शपथविधी होऊन १५ दिवसांचा काळ उलटला आहे. जे काही घडल ते तुमच्या सर्वांच्या साक्षीनं घडलं आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची कारकीर्द ही उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला प्रथेनुसार चहापानाचे आयोजन केले होते. या प्रथेमध्ये विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची पोट-प्रथा पाडली. आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. आपल्या पंतप्रधानाची पार्श्वभूमी आपल्याला माहित आहे. पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकावा हे किती सुसंगत वाटते असा प्रश्न पडला आहे? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.  

जे पाकिस्तान करत आले तेच आता काँग्रेस करतंय : PM मोदी

ते पुढे म्हणाले शेतकऱ्याला कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्त करायचे आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात काही तक्रारी आल्या आहेत. या प्रकल्पाला स्थगिती देणार नाही. पण यात भ्रष्टाराचार झाला असेल तर तो जनतेसमोर आणण्यासाठी सरकार कटिबद्ध राहिल.