पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्या कशाला आत्ताच सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गेली २५-३० वर्षे ज्यांच्याबरोबर एकत्र होतो, त्यांनी कधीच विश्वास दाखवला नाही. ज्यांच्याविरोधात २५-३० लढलो. त्यांनी एका बैठकीत विश्वास दर्शवला.  मी आव्हान स्वीकारणाऱ्या आणि आव्हान देणाऱ्या शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. तीन वेगवेगळ्या पक्षांचे विचार एकत्र आले आहे. आम्ही एकत्र आहोत, मजबूत आहोत. हे सरकार पाडण्याची भाषा करणारे 'ऑपरेशन लोट्स' राबवणार असल्याचे म्हणतात. पण त्यांना आम्ही 'लोटलं' आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. उद्या कशाला सरकार पाडता. आत्ताच सरकार पाडून दाखवा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. 

ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात लवकरच भाजपचे आंदोलनः तावडे

मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. 

खुनाच्या आरोपाखाली १४ वर्षे तुरुंगात, तरीही झाला डॉक्टर

ते पुढे म्हणाले, आज मुक्ताईनगर मुक्त झाले आहे. कशापासून, कोणापासून हे तुम्हाला माहीत आहे. त्यांना बंधनात ठेवण्याचे कामही तुम्हीच करत होता, अशी नाव न घेता त्यांनी खडसे यांच्यावर टीका केली. 

शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. त्यांच्या पिकांना दाम मिळाला पाहिजे. आता पुढच्या महिन्यात कर्जमुक्तीला प्रारंभ होईल. आम्ही एकत्र आल्यानंतर सरकारची सुरुवात झाली आहे. 

कुमार विश्वास यांच्या एसयूव्हीची घराबाहेरुन चोरी

यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाषा बोलणाऱ्यांनी आजच ते पाडून दाखवावे असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. शरद पवार यांनीही यावेळी आपले मनोगत बोलून दाखवले.