पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्जमाफीः सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, फडणवीसांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील २ लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या योजनेवर भाजपने टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी या अधिवेशनात एक नवा पैसा दिलेला नाही. २५ हजार हेक्टरी देण्याच आश्वासन न पाळत सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधानसभेचा सभा त्याग केल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर चंद्रकात पाटील, आशिष शेलार आणि पक्षाचे इतर आमदार उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर लगेचच त्याचा निषेध करत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर सभात्याग केला. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी ही कर्जमाफी केली आहे. पण सरसकट कर्जमाफी, ७/१२ कोरा याचे काय? ही कर्जमाफी उधारीची आहे. शेतकरी कर्जमुक्त नव्हे चिंतामुक्त करु असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आमच्या सरकारने दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली होती. त्यातून आम्ही आमदार-खासदारांना वगळले होते.

राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालयः उद्धव ठाकरे

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कर्जमाफीची कुठलीही माहिती त्यांनी दिलेली नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

तत्पूर्वी, दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जाहीर केले. या योजनेला महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.