पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोठा निर्णय: राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली.

APMC मार्केटमध्ये सूचना पाळा, नाही तर भरावा लागेल दंड

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मंत्रालयातील नियंत्रण कक्षातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होती. बैठकी दरम्यान उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली. यावेळी राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकानं २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावी यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय पण परिस्थिती आटोक्यात

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु राहिली तरी सुध्दा नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दी करु नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यावेळी संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत सरकारने सांगितलेल्या सूचना पाळाव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.