पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विद्यापीठे ही फक्त वीटा-मातीपासून तयार झालेली नाहीत'

सरन्यायाधीश शरद बोबडे

देशातील अनेक विद्यापीठातील विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन करत आहेत. याच दरम्यान, सरन्यायाधीश एस. बोबडे यांनी विद्यापीठांविषयी मोठे वक्तव्य केले आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी असे म्हटले आहे की, 'विद्यापीठे ही फक्त वीटा आणि मातीपासून तयार झालेले नाहीत. विद्यापीठाने विधानसभेसाठी नेता तयार करणाऱ्या युनिटप्रमाणे काम करू नये, असे त्यांनी सांगितले.

'इतिहासावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या विषयांवर चर्चा करा'

नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सरन्यायाधीश बोबडे यांनी हे विधान केले आहे. तसंच, 'विद्यापीठांच्या विचारांमधूनच हे कळते की एक समाज म्हणून आपल्याला काय साध्य करायचे आहे, असे देखील त्यांनी सांगितले. 

'सावरकरांचा विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा'

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे हे विधान यासाठी महत्वाचे मानले जात आहे. कारण जामियापासून ते जेएनयूपर्यंत सर्वच विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा, फी वाढ यांसारख्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनाला काही विद्यापीठामध्ये हिंसक वळण देखील आले आहे. दरम्यान, बोबडे यांनी भाषणावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख केला नाही. 

डोंबिवलीत धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी