पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरन्यायाधीश शरद बोबडेंनी क्रिकेट सामन्यात केल्या १८ धावा तरीही...

शरद बोबडे क्रिकेट सामना खेळताना

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे कायम वेगवेगळ्या खटल्यांचा निकाल देण्याच्या मुद्द्यावरून देशात चर्चेत येतात. पण यावेळी एका वेगळ्याच गोष्टीमुळे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. सरन्यायाधीश दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आहेत. यावेळी त्यांनी एका क्रिकेट सामन्यात सहभाग घेतला आणि संघासाठी चांगली कामगिरी करून दाखविली.

अमर, अकबर, अँथनीचे सरकार जास्त टिकणार नाही: रावसाहेब दानवे

नागपूरमध्ये ऑल जजेस इलेव्हन आणि हायकोर्ट बार असोसिएशन इलेव्हन यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. यामध्ये ऑल जजेस इलेव्हनच्या संघामधून सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सहभाग घेतला. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर हा सामना झाला. या सामन्यात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी १८ धावा केल्या. त्यांच्या संघातील इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक धावा त्यांनीच केल्या. न्या. शरद बोबडे हे क्रीडाप्रेमी आहेत. त्यांना  संघासाठी सर्वाधिक धावा करण्यात यश आले. अर्थात हा सामना जिंकण्यात ऑल जजेस इलेव्हन संघाला यश आले नाही आणि हायकोर्ट बार असोसिएशन इलेव्हनने हा सामना जिंकला.