पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आश्रय देणार त्यांना मतदानाचा हक्क मिळणार का?- संजय राऊत

संजय राऊत

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडण्यात आले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधेयकाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून आम्हाला खूप आशा आहेत. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर घुसखोरांना बाहेर काढणार का? आणि ज्यांना आश्रय देणार त्यांना मतदानाचा हक्क मिळणार का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

 

GST मोबदला लवकर मिळाला तर विकासकामांना वेग, मुख्यमंत्र्यांचे पत्र

ते पुढे म्हणाले, जे या विधेयकाच्या बाजूने नाहीत ते देशद्रोही आणि जे या विधेयकाच्या बाजूने आहेत ते राष्ट्रभक्त अशी चर्चा मी ऐकत आहे. पण आम्हाला राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्या शाळेत तुम्ही शिकता त्या शाळेचे आम्ही हेड मास्तर आहोत. आमच्या शाळेचे हेड मास्तर बाळासाहेब ठाकरे होते. अटलजी, श्याम प्रसाद मुखर्जी यांना देखील आम्ही मानतो असेही ते म्हणाले. 

GST च्या टप्प्यांमध्ये लवकरच मोठा बदल; मोबाईल, रेल्वे प्रवास महागणार

लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत शिवसेना या विधेयकाला समर्थन देणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यांची ही भूमिका काँग्रेसच्या दबावातून असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Citizenship Amendment Bill 2019 voting rights Questioned Ask By Shiv Sena Sanjay Raut in Rajya Sabha