पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाजनादेश यात्रेचा प्रारंभ अमित शहा; तर समारोप पंतप्रधान मोदी करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यभरामध्ये 'जनआशीर्वाद' यात्रा सुरु केली. त्याच पार्श्वभूमीर आता भाजप देखील राज्यामध्ये महाजनादेश यात्रा काढणार आहे. मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १ ऑगस्टपासून भाजप महाजनादेश यात्रा काढणार आहे. राज्यातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी गावामधून या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. महाजनादेश यात्रेचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार आहेत. तर यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी ट्रम्प यांना विनंती केली नाही, जयशंकर यांचे स्पष्टीकरण

१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान म्हणजे संपूर्ण ऑगस्ट महिना भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर निघणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा मोझरी गावातून सुरु होईल तो नंदूरबारपर्यंत असणार आहे. तर दुसरा टप्पा हा अकोले ते नाशिक असा असणार आहे. विशेष म्हणजे ३० जिल्ह्यांतील १५२ विधानसभा मतदार संघामध्ये ही महाजनादेश यात्रा जाणार आहे. या यात्रे दरम्यान, मुख्यमंत्री मतदारांची भेट घेऊन भाजप सरकारने केलेल्या योजनांची माहिती देणार आहेत. तसंच त्याच दरम्यान १०४ जाहीर सभा, २२८ स्वागत सभा आणि २० पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

काश्मीर हा तर भारत-पाकचा दि्वपक्षीय मुद्दा, अमेरिकेची कोलांटउडी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळवलेले यश हे पुन्हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मिळावे यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना भाजपने केलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी मुंख्यमंत्री स्वत: संपूर्ण महाराष्ट्र फिरणार आहेत. महाजनादेश यात्रेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहभागी होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. 

हरभजन सिंग शुभेच्छा द्यायला गेला आणि स्वतःच ट्रोल झाला!