पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पदभार स्वीकारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी केले हे काम

देवेंद्र फडणवीस पदभार स्वीकारताना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात पदभार स्वीकारला. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी प्रशासकीय वर्गाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर त्यांनी सर्वात आधी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्द केला.

राम जन्मभूमीचा मुद्दा उपस्थित करत मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

श्रीमती वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. या उपचारावरील खर्चासाठी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकडे काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. या अर्जावर तातडीने कार्यवाही होऊन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, राहुल गांधींचा घणाघाती आरोप

गेल्या शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.