पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नदीजोड, सिंचन प्रकल्पांसाठी जपानने पुढे यावे, देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे यापुढचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नदीजोड आणि सिंचन विकास प्रकल्पात जपानच्या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी सोमवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आदी उपस्थित होते.

स्टेट बँकेची ही सेवा १ ऑगस्टपासून मोफत

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील ५२ टक्के भूप्रदेश हा अवर्षणग्रस्त आहे. उर्वरित ४८ टक्के प्रदेशात काही प्रमाणात निश्चित असा पाऊस होतो. पण या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात जाते. दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ दरवर्षी अवर्षणाला तोंड देत असतो. त्यामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी रोखून ते विविध मार्गांनी या अवर्षणग्रस्त प्रदेशात कसे पोहोचविता येईल, असे प्रयत्न करण्यात येतील. यासाठी नदी जोड, वॅाटर ग्रीड अशा विविध उपाय योजना राबविण्याचा प्रय़त्न आहे. यामुळे या अवर्षणग्रस्त भागाला दिलासा मिळणार आहे. शाश्वत अशा सिंचन सुविधा निर्माण करता येणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असेल. यासाठी जपानमधील कंपन्यांना आणि गुंतवणुकीला मोठी संधी आहे. त्यासाठी त्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.

९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये रंगणार

जपानने राज्यातील महत्त्वाकांक्षी अशा अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य देऊ केले आहे. त्यामध्ये मेट्रो आणि स्मार्ट सिटीज प्रकल्पांचा समावेश आहे. या योजना- प्रकल्पांतील जपानचे सहकार्य असेच कायम राहील, पण त्यापुढे जाऊन नदी जोड आणि सिंचन प्रकल्पातही जपानच्या कंपन्यांना गुंतवणुकीची संधी आहे. त्यासाठी त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:chief minister devendra fadnavis expected japan help in irregation and water supply sector